पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीजवळील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर गेल्या ४५ वर्षांपासून वसलेल्या दत्तवाडीतील घरे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज हटविली. चौफुलीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून बाजार समिती जोपूळ रोडला आल्याने चिंचखेड चौफुलीवर तासनतास वाहतूक कोंडी होत होती.दत्तवाडीतून जोपूळकडे जाणार रस्ता होता. मात्र स्थानिक राजकारण व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला होता. अखेर न्यायालयाची स्थगिती उठल्याने महसूल खाते व सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी राहणाऱ्या ३५ कुटुंबांना एक महिना आधीच नोटिसा बजावत जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेला रस्ता कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ताठर भूमिका घेत प्रशासनाला विरोध करत जागा खाली करण्यास नकार दिला. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने या बाबतीत रविवारी नागरिकांशी सवांद साधत जागा खाली करण्याची विनंती केली. तरीही नागरिकांनी नकार दिला. अखेर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कर्मचारी, ७५ पोलीस कर्मचारी, पाच अधिकाºयांचा ताफा, चार जेसीबी, दहा ट्रॅक्टर दत्तवाडीत दाखल झाले. तहसीलदारांच्या आदेशाने बाजार समितीचे ट्रॅक्टरही बोलावण्यात आले. पोलीस बंदोबस्तात दत्तवाडीच्या अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. काहीकाळ नागरिकांनी विरोध करत आठ दिवसाची मुदत द्या, अशी विनंती केली. मात्र एक महिना आधीच सूचना दिल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी आपल्या संसारोपयोगी वस्तू बाहेर काढल्यास सुरुवात केली. यात ग्रामपंचायत कर्मचाºयांनी नागरिकांना सहकार्य करत घरे खाली करून घेतली. यावेळी बांधकाम विभागाचे महेश पाटील, अतुल छापकर, नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, मंडल अधिकारी एस. ए. शेख, पोलीस निरीक्षक सुरेश मणोरे, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.सध्या बाजार समितीकडे जाणारी वाहने चिंचखेड चौफुलीवरून जोपूळ रस्त्यावर जातात. अतिक्र्रमण काढल्याने बाजार समितीला जोडणारा रस्ता थेट महामार्गाला जोडला जाणार आहे. महामार्ग ते बाजार समिती रस्ता या साडेपंधरा कोटींच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. महामार्गापासून कामाला सुरुवात होणार आहे. काही महिन्यातच चिंचखेड चौफुली मोकळा श्वास घेणार आहे. सकाळी ९:४५ सुरू मोहीम झाली दुपारी २ वाजेपर्यंत शंभर घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली.सर्व अधिकारी ठाण मांडून होते.सुरुवातीला थोडा विरोध झाला; मात्र नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.दत्तवाडीतील अतिक्र मण काढणे गरजेचे होते. अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यात ठरावीक कुटुंबानाच जागेची गरज आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेऊन निश्चितच मार्ग काढला जाईल.- अल्पेश पारख, ग्रामपंचायत सदस्य
अखेर महामार्गावरील दत्तवाडी जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:20 AM
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीजवळील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर गेल्या ४५ वर्षांपासून वसलेल्या दत्तवाडीतील घरे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज हटविली. चौफुलीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून बाजार समिती जोपूळ रोडला आल्याने चिंचखेड चौफुलीवर तासनतास वाहतूक कोंडी होत होती.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या भूखंडावरील घरे हटविली