पंचवटी : हिरावाडी पाटाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाली होती; मात्र चर्चेनुसार पुरावे उपलब्ध होत नव्हते, बिबट्याचे वास्तव्य नव्हे तर वावरही असल्याचे पुरावे वनविभागाकडून शोधले जात होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी हिरावाडीतून वज्रेश्वरीनगरकडे जाणाºया रस्त्यावर ‘मेरी हायड्रो’च्या संरक्षक भिंतीवर बिबट्याचा ठिय्या नागरिकांनी बघितला. बिबट्याची ही रुबाबदार बैठक सोशल मीडियावरून व्हायरल झाली. सदर बाब लक्षात घेऊन छायाचित्रांची ओळख पटल्यानंतर खात्री करून वनविभागाच्या कर्मचाºयांनी हायड्रोच्या जंगलात ‘त्या’ भिंतीपासून शंभर मीटरच्या अंतरावर रविवारी (दि.१०) पिंजरा तैनात केला आहे.
...अखेर ‘हायड्रो’च्या जंगलात पिंजरा तैनात : भीतीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:26 PM
नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने पुन्हा मेरीचे हायड्रो गाठले. संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा अधिवासामधील पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हायड्रोच्या परिसरात दुपारी पिंजरा लावला.
ठळक मुद्देरविवारी वनविभागाने पिंजरा लावला दिवसभर रेस्क्यू आॅपरेशन‘मेरी हायड्रो’च्या संरक्षक भिंतीवर बिबट्याचा ठिय्या नागरिकांनी बघितला.