सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन विकृत तरुणाविरु द्ध फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे.बागलाण तालुक्यातील श्रीपुरवडे येथील गरीब शेतकरी कुटुंब गेल्या शनिवारी पेरणीसाठी शेतात गेले होते. त्याचा फायदा घेऊन घरात तिघी बहिणी एकट्या असल्याचे पाहून जगदीश मनोहर कापडे (२६) या विकृताने घरात घुसून छेडछाड केली. घाबरलेल्या तिन्ही बहिणींनी आरडाओरडा करून सुटका करून घेतली. हा सर्व प्रकार त्यांनी आईवडिलांकडे कथन केला. या गंभीर प्रकाराबाबत पीडित मुली व त्यांच्या मातापिता यांनी जायखेडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली; मात्र पोलीस अधिकारी व त्या बीटच्या पोलीस कर्मचाºयाने बदनामी होईल म्हणून भीती घालून तक्र ार घेण्यास टाळाटाळ केली. एकप्रकारे त्या विकृताला वाचविण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आज मंगळवारी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी श्रीपुरवडे गावाला भेट देऊन पीडित मुलींसह त्यांच्या मातापित्याची भेट घेतली. यावेळी जाबजबाब घेऊन फिर्याद घेतली. जायखेडा पोलिसांनी जगदीश कापडे याच्या विरु द्ध पोस्को, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल केले आहेत.
अखेर श्रीपुरवडेतील ‘त्या’ विकृताविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:58 PM
सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन विकृत तरुणाविरु द्ध फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देगंभीर प्रकाराबाबत पीडित मुली व त्यांच्या मातापिता यांनी जायखेडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली