पाटोदा : दहेगाव पाटोदा येथील धनवटे वस्ती ते जाधव वस्ती हा वहिवाटीचा रस्ता अखेर मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.अशोक पवार या शेतकऱ्याने अतिक्रमण करून हा वहिवाट रस्ता नांगरल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास अडचण येत असल्याने येथील शेतकरी रामचंद्र बंडू घोरपडे व ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व पालकमंत्री, बांधकाममंत्री आदिंकडे तक्रार करून हा वहिवाट रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी करून शेतकऱ्याने अतिक्र मण काढून रस्ता वहिवाटीसाठी मोकळा करावा, असा आदेश दिला होता; मात्र संबंधित शेतकरी रस्ता मोकळा करीत नसल्याने पीडित शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट रोजी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असता नायब तहसीलदार सविता पठारे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन रस्ता आठ दिवसांत वहिवाटीस मोकळा करून देण्यात येईल असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली होती. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेतले होते. रस्ता मोकळा करून दिला जात नसल्याने प्रकरण नेहमीच हमरीतुमरीवर येत असल्याने वाद वाढत चालला होता. पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला
...अखेर वहिवाटीचा रस्ता मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2016 12:02 AM