प्रभाव लोकमतचा
पंचवटी : पंचवटी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलालगत जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने याची दखल घेत जॉगिंग ट्रॅकवर काम सुरू केले आहे.लोकमतमध्ये ‘हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅकची वाट बिकट’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची महापालिकेने दखल घेत काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिका प्रशासनाने लाखो रु पये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. ट्रॅकवर पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.सदर ट्रॅकवर खडी व माती टाकली असली तरी पाण्याचा फवारा मारून ट्रॅकचे सपाटीकरण केले नसल्याने खडी व माती उखडली गेली होती. परिणामी ट्रॅकवर फिरण्यासाठी येणाºया नागरिकांना खडी व मातीवरूनच चालावे लागत होते.ट्रॅकचे काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत होती. तर सदर जॉगिंग ट्रॅकचे काम करणाºया ठेकेदाराला कामाची रक्कमदेखील अदा केल्याने त्याने उर्वरित कामाकडे दुर्लक्ष केल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले होते. पालिकेने आता जॉगिंग ट्रॅकच्या कामाला सुरुवात केली आहे.नागरिकांच्या तक्र ारीची दखलहिरावाडीतील पाटकिनाºयालगत नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून लाखो रु पये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. सदर ट्रॅकवर खडी, माती पडलेली असल्याने तसेच ट्रॅकचे सपाटीकरण काम पूर्ण जॉगर्सला खडी व मातीवरून चालावे लागत होते. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांना संपर्क करून पाण्याचा फवारा मारून ट्रॅकचे सपाटीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या.- रु ची कुंभारकर, नगरसेवक