चांदोरी : म्हाळसाकोरे गावाला वीजपुरवठा करणारा रोहित्र दुरुस्त करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या काही दिवासांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने गावाचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने दखल घेत रोहित्र दुरु स्त करून गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला.अतिदाबामुळे म्हाळसाकोरे गावातील तीन रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाशी संपर्क साधून दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र रोहित्र उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले गेले. वृत्त प्रसिद्ध होताच तीनही रोहित्र इतर वीज केंद्राकडून मागवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.ग्रामस्थांमध्ये समाधानदहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांना अंधारामुळे अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या. जनजीवन विस्कळीत झाले होते. याबाबत नागरिकांनी कनिष्ठ अभियंता मनीषा वासने यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. अखेर रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरक्षित झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अखेर म्हाळसाकोरेचा वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 9:39 PM
म्हाळसाकोरे गावाला वीजपुरवठा करणारा रोहित्र दुरुस्त करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवासांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने गावाचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या.
ठळक मुद्देचांदोरी : महावितरण कंपनीकडून तातडीने दखल