नाशिक : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या करारनाम्याला महापालिकेच्या स्थायी समितीने कुठलाही विरोधाचा सूर न लावता एकमताने मंजुरी दिल्याने अखेर तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रवासानंतर मुकणे पाणी योजना ट्रॅकवर आली आहे. २६६ कोटी रुपये खर्चाच्या निविदेला कमी-अधिक भावातील फरकासह मान्यता देण्यात आल्याने जवळपास निम्म्या नाशिकचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला महापालिकेच्या महासभेने दि. १ आॅगस्ट २००९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या सुकाणू समितीने दि. १७ डिसेंबर २०१३ रोजी योजनेला अंतिम मान्यता दिली होती.
अखेर मुकणे योजना ट्रॅकवर
By admin | Published: December 16, 2015 12:02 AM