सिडको : राज्यासह देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे, परंतु अत्यावश्यक सेवेमध्ये असलेला भाजीपाला विक्र ी करणारे विक्रे ते व ग्राहक यामुळे सिडकोतील पवननगर भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत सांगूनही कुणी ऐकत नसल्याने अखेर महापालिकेने पोलीस बंदोबस्तात पवननगर भाजीमार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .करोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात लॉकडाउन असताना सिडकोतील पवननगर येथील भाजीबाजार गजबजलेला असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व स्थानिक भाजीविक्रे त्यांच्या समन्वयाने येथील भाजीबाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.गोविंदनगर येथील मनोहरनगर परिसरात कोरोना पॉझटिव्ह रु ग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर तीन किलोमीटरचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला त्यात मोठ्या गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील भाजीबाजार सर्वप्रथम बंद करण्यात आला. दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाजीखरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असत प्रशासनाच्या या निर्णयामुळे सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाची प्रशंसा केली मनोहरनगरपासून तीन किलोमीटरच्या आत असलेला पाटीलनगर उद्यान शेजारील भाजीबाजारदेखील असाच बंद करण्यात आला, मात्र सुरक्षित अंतर ठेवा हा नियम धाब्यावर बसवित हजारोंच्या संख्येने गर्दी होत असलेला पवननगर येथील जिजामाता भाजीमार्केट अद्यापही सुरू होते. या ठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्याकरिता पोलीस व मनपा प्रशासनाच्या वतीने भाजीविक्र ी त्यांनीसोबत चर्चा करून गर्दी टाळण्याकरिता उपायोजना करण्याबाबत सुरक्षित अंतर ठेवत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार, सहायक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्यासह मनपा सिडको विभागीय अधिकारी एस. जी. शिंदे उपस्थित होते. यावेळी भाजीविक्रे त्यांनी भाजीमार्केट बंद ठेवत सिडको व परिसरात इतरत्र भाजीविक्र ी करण्याचा निर्णय घेण्यात आला सुरक्षित अंतर ठेवा या नियमाचे पालन करत भाजीविक्र ी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
अखेर पवननगर भाजीबाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:54 PM