लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : गेल्या बारा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले येथील उपजिल्हा रु ग्णालय अखेर खुले झाले असून, परिसरातील कोविड रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरसह आॅक्सिजनची सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रोडवर भव्य अशा उपजिल्हा रु ग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना रु ग्णांना तत्काळ आॅक्सिजनची सुविधा मिळावी यासाठी बुधवारी (दि. २) आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते फीत कापून रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात आले. तत्कालिन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांनी हे रूग्णालय मंजूर केले होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उपअभियंता महेश पाटील, अभियंता छापरवाल आदी उपस्थित होते. यावेळी मविप्रचे माजी संचालक विश्वास मोरे, ग्रामसेवक लिंगराज जंगम, शशी राजोळे, पुंडलिक घोलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.हजार किटची मंजुरीकोरोना चाचणीसाठी हजार किटची मंजुरी शासनाकडून मिळाली आहे. त्यापैकी २०० कीट पिंपळगावसाठी मिळणार असल्याचे दिलीप बनकर यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आमदार बनकर यांनी घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता सतत हात धुवावे, गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा कायम वापर करावा असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले.
अखेर पिंपळगाव रुग्णालय कोविड रुग्णांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 10:32 PM
पिंपळगाव बसवंत : गेल्या बारा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले येथील उपजिल्हा रु ग्णालय अखेर खुले झाले असून, परिसरातील कोविड रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरसह आॅक्सिजनची सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देदिलासा : कोरोना रु ग्णांना मिळणार आॅक्सिजनची सुविधा