कळवण : कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आलेली असल्याने अनेकजण अडकून पडले. अटल आरोग्यवाहिनी योजनेअंतर्गत स्थलांतरित कर्मचाऱ्याच्या प्रसूत झालेल्या पत्नीला कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा मूळगावी सोडण्यात आले.पुणे येथे सार्वजनिक सेवेत काम करीत असलेले कर्मचारी अरविंद वसावे हे आपल्या गर्भवती पत्नीला सोबत घेऊन पुणे-नंदुरबार दरम्यान बसने प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला मनमाडनजीक प्रसूती कळा सुरू झाल्या आणि त्यांनी बसच्या चालक व वाहक यांना मनमाडची बस उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस शासकीयरुग्णालयात नेवून महिलेस प्रसूतीसाठी दाखल केले. सदर महिला सुखरूप प्रसूत झाली. दुसºया दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांनीरुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका मिळण्याबाबत चौकशी केली, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते हताश झाले.प्रसूत महिलेला व बाळाला घेऊन शेकडो कि.मी. अंतर कापत घर गाठायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. त्याचवेळी त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या लतिका राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आदिवासी विकास विभाग तळोदा, नंदुरबार प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. त्यानुसार तळोदा, नंदुरबार प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी अपर आयुक्त पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क करून मदत घेतली. आयुक्त पाटील यांनी कळवण प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी पंकज बुरकुले यांना सूचना करून अटल आरोग्य वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या कनाशी येथील रुग्णवाहिका उपलब्ध करीत तत्काळ उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे पाठविण्यात आली व सदर कुटुंबाला त्यांच्या मूळगावी मु. पो. देवमोगरा, ता. अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथे घेऊन जाण्याची व्यवस्था करून पोहोचविण्यात आले.--------------------------पत्नी गर्भवती असल्याने तिची काळजी घेण्यास घरी कोणी नसल्याने त्यांना गावी सोडणे महत्त्वाचे होते. म्हणून आम्ही बसने गावी चाललो होतो. अचानक प्रसूती वेदना जाणवल्याने मनमाड येथे शासकीय रु ग्णालयात दाखल करावे लागले. प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने आदिवासी विकास विभागानेरु ग्णवाहिका उपलब्ध करून दिली.- अरविंद विसावे, कर्मचारी