देवळा तालुक्यातील वासोळ येथे सोमवारी ( दि.१४ ) ही हृदयद्रावक तशीच संतापजनक घटना उजेडात आली होती. येथील आदिवासी वस्तीतील असलेल्या पडक्या झोपडीजवळ एका अज्ञात व्यक्तीने काही तासांपूर्वी जन्माला आलेल्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला टाकून दिले होते. त्यानंतर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी सदर नवजात शिशूच्या पायाचे लचके तोडले तेव्हा सकाळी त्याच्या रडण्याच्या आवाजाचा परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता ही संतापजनक घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती पोलीसपाटील कैलास खैरणार व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना समजली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या नवजात शिशूला गावातील आरोग्यवर्धिनी केंद्रात तत्काळ दाखल केले. गंभीर स्थिती असल्याने अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. अखेर बुधवारी (दि.१६) मातेचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
इन्फो
अविवाहित महिला ताब्यात
वासोळ येथील रहिवासी असलेल्या या अविवाहित महिलेच्या पोटी अनैतिक प्रेमसंबंधातून स्त्री जातीचे अर्भक जन्माला आले. मात्र या मातृत्वाबाबत समाजात आपल्याला विचारणा होईल, या भीतीने घाबरून सदर महिलेने बाळ गावातील आदिवासी वस्तीतील मोडक्या झोपडीजवळ टाकून पसार झाल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाळू पवार, प्रकाश सोनवणे, सुरेश कोरडे आदी करीत आहेत.
फोटो- १६ देवळा चाईल्ड
===Photopath===
160621\16nsk_42_16062021_13.jpg
===Caption===
फोटो- १६ देवळा चाईल्ड