नाशिक : जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक-१४मधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मागील सहा वर्षांपासून नामफलकाची प्रतीक्षा होती. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली जात होती; मात्र पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती.जुन्या नाशकातील भद्रकाली, पिंजारघाट, खडकाळी या भागाला जोडणाऱ्या रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळखला जातो. १९६५च्या भारत-पाक युध्दात वीरमरण आलेले अब्दुल हमीद यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केले आहे.
...अखेर ‘त्या’ शहीद चौकाला मिळाला नामफलक; उपेक्षा थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 1:06 PM
महापालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती.
ठळक मुद्दे १० सप्टेंबर १९६५साली त्यांना वीरमरण आले. १९६५च्या भारत-पाक युध्दात अब्दुल हमीद जखमी झाले होतेभारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केले