शुभ वर्तमानमानोरी : ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडाच’ हे वृत्त लोकमतध्ये शनिवारी (२५) ला प्रकाशित करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथे प्रशासनाने अखेर दखल घेत टँकर सुरू केला आहे.चाळीशी पार केलेल्या तापमानात खडकीमाळ येथे हातपंप, सार्वजनिक विहिरी कोरड्याठाक पडलेल्या असल्याने मागील पंधरा ते वीस दिवसापासून भीषण दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.याबाबत येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मानोरी ग्रामपंचायतकडून तात्काळ टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाकडे प्रशासनाने सुरु वातीला आठ ते दहा दिवस दुर्लक्ष केले होते. यावेळी लोकमतने ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडा’ असल्याचे वत्त प्रकाशित केले होते. यानंतर मंगळवारी (दि.४) पासून खडकीमाळ येथे टँकर सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या. त्याआधी येथील एका विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी असून संबंधित विहीर अधिग्रहण करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या होत्या. परंतु खडकीमाळ येथील कोणत्याही विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी नसून जनावरांसाठी उसनवारी करून साठवून ठेवलेले पाणी असल्याचे नागरिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून देत संबंधित विभागाला खडकीमाळ येथे टँकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे खडकीमाळ येथे टँकर सुरू झाल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती काहीशी थांबणार असून येथील ग्रामस्थांनी लोकमतचे आणि प्रशासनाचे आभार मानले.येवला तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून प्रशासन टँकर सुरू करण्यासाठी योग्य ती प्रयत्न करत आहे. नागरिकांनी पावसाळा सुरू होईपर्यंत काळजीपूर्वक पाणी वापरणे गरजेचे आहे.- बाळासाहेब कुशारे,ग्रामसेवक, मानोरी बु.
.. अखेर खडकीमाळ येथे पाणी टँकर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 6:37 PM
मानोरी : ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडाच’ हे वृत्त लोकमतध्ये शनिवारी (२५) ला प्रकाशित करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथे प्रशासनाने अखेर दखल घेत टँकर सुरू केला आहे.
ठळक मुद्देमानोरी : लोकमत वृत्ताची प्रशासनाने घेतली दखल