पोलीस आयुक्तालयाकडून तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा एका खासगी कंपनीला टोइंगचा ठेका देण्यात आला आहे. विविध अटी-शर्तींच्या अधीन राहून टाेइंगची कारवाई पार पाडण्याचा करार पोलिसांनी संंबंधित ठेकेदाराकडून लिहून घेतला आहे. हायड्रोलिक वाहनांच्या मदतीने दुचाकी, चारचाकींना टोइंग करण्याचे प्रात्यक्षिक पोलीस आयुक्तालयात मंगळवारी संध्याकाळी दाखविण्यात आले. बुधवारपासून चार टेम्पोंसह तीन क्रेन व्हॅनच्या साहाय्याने रस्त्यांवरील नो-पार्किंग झोनमध्ये उभी असलेली वाहने उचलली जाणार आहेत. टोइंग केलेली वाहने शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या युनिट - २च्या कार्यालयात जमा केली जाणार आहेत.
तेथे दंडाची एकूण रक्कम भरून वाहनमालकाला आपले वाहन ताब्यात घेता येणार आहे. तसेच वाहन उचलताना वाहनमालक जागेवर आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांसह वाहनावरील वाहतूक पोलिसांना केवळ शासकीय दंडाची रक्कम घेऊन तत्काळ त्याचे वाहन जागेवरच देण्याचे आदेशही यंदा पोलिसांकडून देण्यात आले आहेत. जेणेकरून वादविवादाचे प्रसंग कमी होतील, असा विश्वास शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी व्यक्त केला आहे.
--इन्फो---
असे आहेत टोइंगचे दर...
दुचाकी - टोइंग कारवाई ९० व शासकीय तडजोड शुल्क २०० असे एकूण २९० रुपये
तीनचाकी - टोईंगचा दर १ रुपया व शासकीय तडजोड शुल्क २०० रुपये असे एकूण २०१ रुपये
चारचाकी- टोइंग दर ३५० व शासकीय तडजोड शुल्क २०० असा एकूण ५५० रुपये
--इन्फो---
पाच ठिकाणी होणार कारवाई
ही यंत्रणा प्रोयोगिक असून, सीबीएस व शालिमार भागातील दहा ठिकाणे, महामार्ग बस स्थानकासमोरील मुख्य रस्ता, उंटवाडी येथील मॉल परिसर, रविवार कारंजा आणि पंचवटीतील पाच नो-पार्किंगच्या ठिकाणांवर ही कारवाई होणार आहे. तीन महिन्यानंतर शहरातील उर्वरित ठिकाणांचा विचार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
060721\06nsk_46_06072021_13.jpg~060721\06nsk_47_06072021_13.jpg
टोइंग कारवाई~टोइंग कारवाई