पेठ - गाव खेडमातील प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाची गरज भागवण्यासाठी दररोज २० ते २५ किमी पायपीट करावी लागत असलेल्या पेठ तालुक्यातील भूवन भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून पेठ आगाराने सुरू केलेल्या बोरपाडा बसचे स्वागत करण्यात आले.पेठच्या पश्चिमेकडील भूवन, आंबापाणी, बोरपाडा, उम्रद, बोंडारमाळ, खामशेत,धानपाडा आदी गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पेठ पर्यंत पायपीट करावी लागत होती. धानपाडा येथील सरपंच रमेश दरोडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. अखेर विद्यार्थी हित लक्षात घेऊन पेठ- बोरपाडा बसफेरी सुरू करण्यात आली असून पाहिल्याच दिवशी या परिसरातील प्रवाशी व विद्यार्थ्यांनी बसचे स्वागत करून चालक - वाहकांचा सत्कार केला.
अखेर विद्यार्थ्यांची थांबली पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 7:08 PM