कोट...
या नियमावलीत नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ॲमेनिटी स्पेससंदर्भात दिलासा देताना आता चार हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाचा भूखंड असेल तर त्यांनाच अशाप्रकारे ॲमेनिटी स्पेससाठी जागा सोडावी लागणार असल्याने छोट्या प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाहनतळासाठी आता पूर्वीप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात जागा सोडावी लागणार नाही.
- रवि महाजन, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो
कोट...
नाशिककरांच्या अनेक अडचणी यातून दूर हेाणार आहेत. काही एन्सिलरी एफएसआय ही संकल्पना चांगली आहे. अनेक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी सिडको आणि नाशिक शहरातील टीपी वन या क्षेत्राला नियमावली लागू का केली नाही हे कळले नाही. त्यामुळे सिडकोचे बकालपण संपणार काय, हा प्रश्न आहे. तसेच नाशिकची टीपी स्कीम ही जुनी असून, तेथेदेखील विकास खुंटण्याची शक्यता आहे.
- अविनाश शिरोडे, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ
कोट...
इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये भूखंडांचे आकार लहान आहेत. त्यामुळे नियोजनावर मर्यादा होत्या. आता मात्र या नियमावलीमुळे रुग्णालये, शैक्षणिक संस्था, व्यापरी संकुले यासाठी मार्जिनल स्पेस शिथिल केल्याने लहान रस्त्यांलगत आणि लहान भूखंडांवरदेखील प्रकल्प राबवणे शक्य होणार आहे. लघू आणि मध्यम उद्योजकांना त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. ॲमेनिटी स्पेसच्या शिथिलतेमुळे विकासाची क्षमता वाढेल.
- संजय ?????????????, वास्तुविशारद
अत्यंत दिलासादायक नियमावली आहे. या नियमावलीत आता पार्किंगसाठी ज्यादा जागा सोडावी लागणार नाही, तसेच सायकलसाठी जागा सोडण्याची गरज राहिलेली नाही. बाक्लनी एन्क्लोजरलादेखील परवानगी देण्यात आली आहे. असे खूप नियम सोईचे आहेत.
- संजय म्हाळस, संस्थापक सदस्य, नरेडको.