नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.पाण्याचा लाभ भालूर क्षेत्रातील शेतकरी वर्गास होणार आहे. लोहशिंगव्याच्या धरणावर मंगळवारी (दि.१६) रात्री १० वाजता लोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.रात्रीच्या वादावादी नंतर बुधवारी (दि.१७) भालूरकरांनी पाणी सोडले नाही तर आमरण उपोषण करू असे तहसीलदारांना पत्र दिले.शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी जल संधारण विभागाकडे २५,२०० रु. ची रक्कम अदा केली होती. पैसे भरून ही लोहशिंगवे येथील काही शेतकऱ्यांनी खोडसाळपणा करून गेट बंद पाडले व शासकीय कर्मचारी यास दमदाटी केल्याचे तीव्र पडसाद उमटले.गुरुवारी कळवणच्या उपअभियंता वैशाली ठाकरे, शाखा अभियंता सुनील गांगुर्डे, चौकीदार त्र्यंबक भोकनाळ व ताडगे यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.तत्पूर्वी नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्याकडे बैठक झाली. बैठकीस शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, लोहशिंगवेचे माजी सरपंच नथू हेंबाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परसराम शिंदे, पोपट सानप, पोपट गुळवे, भारत काकड, राजेंद्र तळेकर आदी उपस्थित होते.(१८ नांदगाव वॉटर)लोहशिंगवे धरणातून पाणी कालव्यात सुटले तो क्षण.
अखेर लोहशिंगवे धरणातून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 8:57 PM
नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले.
ठळक मुद्देलोहशिंगवे व भालूर या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी आले होते.