दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी ठोकळवाडीतील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवस रात्र वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मायदरा-धानोशी येथील जवळपास अंदाजे साठ सत्तर कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील ग्रामस्थ महिलांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटापर्यंत डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावरून पाणी मिळेल तिथे जाऊन मैलोन् मैल प्रवास करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने व विद्यमान जिल्हा परिषद सदस्याने ठोकळवाडीत पाण्यासाठी दोन हात पंप दिले परंतु त्या हात पंपांनी पूर्ण तळ गाठला. त्यामुळे एकाच हात पंपावर संपूर्ण ठोकळ वाडी गर्दी करते. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी तत्काळ स्वीय सहाय्यक संजय डावरे यांना ठोकळवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याविषयी समस्या जाणून घेत तेथील नागरिकांचा पाणीप्रश्न तत्काळ सोडविण्यास सांगितले. त्यानुसार तसा प्रस्ताव इगतपुरी पंचायत समिती येथे पाठविण्यात येऊन त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ठोकळवाडीकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. गावात टँकर आला. त्याप्रसंगी सरपंच पुष्पा बांबळे, शिवा वाणी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, डाॅ. श्रीराम लहामटे, दौलत बांबळे, आनंदा कोरडे, संतोष साबळे, विजय बांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- ०३ नांदूरवैद्य
०३ नांदूरवैद्य१
ठोकळवाडी येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत ग्रामस्थांची तहान भागवण्यात आली.
===Photopath===
030521\03nsk_26_03052021_13.jpg~030521\03nsk_27_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ नांदूरवैद्य~०३ नांदूरवैद्य१