शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

अखेर जिल्हा परिषदेला ‘इतिवृत्त’ प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:42 AM

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. प्रशासकीय इमारतीच्या जागा हस्तांतरणाबाबत सर्व शासकीय सोपस्कर पूर्ण होऊनही केवळ पशुसंवर्धनमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेचे इतिवृत्त प्राप्त नसल्याने जिल्हा परिषदेला पुढे पाऊल टाकणे कठिंण झाले होते. आता पशुसंवर्धन विभागाकडील इतिवृत्त प्राप्त झाल्यामळे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची सध्याची जागा अपुरी असल्याने आणि वाहनतळाचा प्रश्न बिकट झाल्याने जिल्हा परिषदेला नव्या जागेची प्रतीक्षा होत. त्र्यंबकरोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुट पालन केंद्राच्या जागेवर नूतन इमारत बांधण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडूनदेखील हिरवाकंदील मिळाला होता. मात्र त्यानंतर या संदर्भातील हालचाली मंदावल्याने नवीन जागेचा प्रश्न काहीसा मागे पडला होता. असे असले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करीत नूतन इमारतीबाबत व्यापक प्रयत्न केले होते. मागीलवर्षी जुन-जुलैमध्ये पशुसंवर्धन विभागाची जागा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी देण्याबाबत मंत्री जानकर यांच्या कार्यालयात बैठक झाली होती. परंतु जागा हस्तांतरित करण्याबाबत लेखी नसल्याने जिल्हा परिषदेसमोरदेखील पेच निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेने ५० कोटी रुपयांची सहा मजली प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव करून तो शासनाकडे पाठविला होता. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याकडे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. शासन दरबारी पत्रव्यवहार करण्याची सर्व तयारी झालेली असताना जागा हस्तांतरणासंदर्भात इतिवृत्तदेखील नसल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेला इतिवृत्ताची प्रतीक्षा होती.अशी असेल इमारतत्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कलजवळ असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागेत जिल्हा परिषदेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे १८ हजार २४१ चौरस मीटरमध्ये सदर इमारत उभी राहणार आहे. तळमजल्यासह सहा मजली भव्य इमारत उभारण्याचा हा प्रस्ताव असून, सदर इमारत पर्यावरणपूरक बनविण्याचा मानस जिल्हा परिषदेने केला आहे. तसा प्रस्तावच तयार करण्यात आला असून नैसर्गिक वातावरण लाभेल यादृष्टीने प्रत्येक मजल्याचे बांधकाम केले जाणार आहे. अतिशय कमी जागा वापरून जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद