सिन्नर : महिला बचत गटांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविण्यासाठी मोठा हातभार लावला असून, अधिकाधिक लघु उद्योग सुरू करावे यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन व साहाय्य्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली. येथील सिन्नर नगर परिषद कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महिला व बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता कार्यशाळा, बचत गटास फिरता निधी वितरण, आरोग्य शिबिर, महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर दीप्ती वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, प्रा. सुनीता कचरे, बँक आॅफ महाराष्ट्रच्या साक्षरता केंद्रप्रमुख सुनंदा सोनवणे आदी उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास शीतल सांगळे, दीप्ती वाजे व नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास विजया बर्डे, नलिनी गाडे, सुजाता तेलंग, सुजाता भगत, ज्योती वामने, मालती भोळे, अलका बोडके, निरुपमा शिंदे, प्रणाली गोळेसर, शीतल कानडी, नगरसेवक शैलेश नाईक, श्रीकांत जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, अनिल जाधव, अर्जुन भोळे, सावित्रीबाई वस्तीस्तरीय संघ, खडकपुरा, भैरवनाथनगर तसेच ४० बचतगटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.मान्यवरांच्या हस्ते दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन भगवती, नालंदा, तथागत, नागेश्वर, समर्थ, रमाबाई, कालिका, गौतमी, वाघंबरी, संघर्ष दिव्यांग बचत गटास प्रत्येकी दहा हजार प्रमाणे एक लाखाचा निधी आर.टी.जी.एस./एन.एफ.टी. द्वारे वर्ग केल्याचे शुभेच्छा पत्र देण्यात आले. डॉ. प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शीतल गाडे, डॉ. स्वप्नाली सरोदे, मीनल येवले यांनी उपस्थित सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना पुढील औषधोपचारासाठी पालिका रुग्णालयात पाठविण्यात आले.
महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा शीतल सांगळे : नगर परिषदेत लघु उद्योजकांसाठी साहाय्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:10 AM
सिन्नर : महिला बचत गटांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविण्यासाठी मोठा हातभार लावला.
ठळक मुद्देआर्थिक साक्षरता कार्यशाळापुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात