नाशिक : शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ हजार रुपये करण्यात आली आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून ४ हप्त्यांमध्ये देण्यात येत होती. परंतु यापुढे ही रक्कम एकाच हप्त्यात देण्याचा निर्णयही या दुरुस्तीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तसेच या दुरुस्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे काही निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार घेण्यात येणाºया शिष्यवृत्ती परीक्षेत शैक्षणिक पात्रता परीक्षा (स्कॉलेस्टिक अॅप्टीट्यूट टेस्ट)व मानसिक अॅबिलिटी टेस्ट (मेंटल अॅबिलिटी टेस्ट) मिळून विद्यार्थ्यांना खुल्या गटासाठी किमान ४० टक्के व अनुसूचित जाती व जमातीसाठी ३२ टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. त्यामुळे यापूर्वीची प्रत्येक विषयात ४० टक्के गुण मिळविण्याची अट आता रद्दबातल झाली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक नियमांबाबत राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना सूचना निर्गमित करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केल्या आहेत.
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:58 PM
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ हजार रुपये करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलप्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच सहा हजार रुपयांची वाढकिमान 40 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ