शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

नाशिकमधील रामायणकालीन भुयारी मार्ग शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:22 AM

पंतप्रधान कार्यालयाचा पुढाकार : गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या पत्राची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकमध्ये अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गोपनीय भुयारी मार्गाचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पाऊल टाकले आहे. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संबंधित पत्र पंतप्रधान कार्यालयाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविले आहे. त्यामुळे पंचवटीतील सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यामधील भूमिगत मार्गाचे उत्खनन होऊन त्यातून रामायणकालीन पौराणिक इतिहासाला उजाळा मिळू शकणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक रामभूमी म्हणून परिचित आहे. श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याच्या अनेक पाऊलखुणा आजही येथे आहेत. भाविक सीतागुंफा आवर्जून पाहतात. गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचेदेवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या कालावधीत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरमध्ये येथील भुयारी मार्गासंदर्भात उल्लेख आहे. नाशिक त्र्यंबक गॅझेटियर १९४२ मध्ये प्रसिद्ध झाले, त्यातही हा संदर्भ आहे.सीतागुंफा म्हणजे सीतामाई यांच्या वास्तव्याचे स्थान. गुंफेच्या पाठीमागील बाजूस शिवलिंग असून, तेथून ते सात मैल लांब मखमलाबादच्या पुढे रामशेज किल्ल्यापर्यंत हे भुयार होते. प्रभू रामचंद्र या भुयारी मार्गानेच रामशेज नावाने परिचित असलेल्या ठिकाणी शयनासाठी जात असत. प्रभू रामचंद्र अज्ञातवासात असताना दंडकारण्यात भ्रमंती करताना सीतामाईला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गुंफेत ठेवत, त्यालाच सीतागुंफा हे नाव पडल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.सध्या गुंफेतील शिवलिंगाजवळील मार्ग बंद आहे. तो शोधल्याने पौराणिक इतिहास खुला होऊ शकेल. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. ते त्यांनी पुरातत्त्व खात्याला पाठविले आहे. त्याची प्रतही मिळाल्याचे जानी यांनी सांगितले.-----------प्रभू रामचंद्रांनी या भुयारी मार्गाचा वापर केला, अशी नोंद आहे. रामायणकालीन अनेक घटना पुढे येण्यासाठी पुरातत्त्व खात्याने उत्खनन करणे आवश्यक आहे.- देवांग जानी, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती------------सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.- दिनेश वैद्य, अध्यक्ष, व्यास ओरिएंटल रिसर्च ---------------रामशेज किल्लादिंडोरीरोडवरील आशेवाडी शिवारातील रामशेज किल्ला हे शिवप्रेमींचे आदराचे स्थान आहे. संभाजी राजे यांनी अखेरपर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. ------------सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे उल्लेख आहेत. फक्त दोन सीतागुंफा आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग कोणत्या गुंफेपासून आहे, हे शोधावे लागेल.- दिनेश वैद्य, अध्यक्ष, व्यास ओरिएंटल रिसर्च