नाशिक/पंचवटी : नाशिक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात रिक्षाचालक प्रवासी भरण्यासाठी तसेच सोडण्यासाठी अनधिकृतपणे प्रवेश करीत असले तरी याकडे मात्र एसटी प्रशासनासह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे काही रिक्षाचालक थेट बसस्थानकातच रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याचे काम करत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येते.बसस्थानकात एसटी बसेस पाठोपाठ रिक्षाचालक रिक्षा उभ्या करत असल्याने बसस्थानक रिक्षास्थानक, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालक बसस्थानकात शिरकाव करत असले तरी याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रिक्षाप्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालकात अनेकदा शाब्दिक वाद होतात. रिक्षाचालकाने पाठोपाठ फळविक्रे ते हातगाडीदेखील बसस्थानकात रस्त्यातच हातगाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात.
सीबीएस बसस्थानकात रिक्षाचालकांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:19 PM
वाहतूक शाखेसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
ठळक मुद्देवाहतूक शाखेसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष