पंचवटी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या उघड्या विद्युत रोहित्रांभोवती पाणवेलींनी विळखा घातल्याने शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत रोहित्राभोवती पाणवेलींची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील साईनगर, गजानन कॉलनी, सुशीलनगर, आशापुरा सोसायटी तसेच चक्रधरनगर या परिसरात रस्त्यालगत वीज वितरण कंपनीच्या वतीने विद्युत रोहित्र बसविले आहे. पावसामुळे विद्युत रोहित्राभोवती पाणवेली वाढून त्यांनी रोहित्राला विळखा घातला आहे.संरक्षित झाकण चोरीवीज वितरण कंपनीने अनेक भागात विद्युत रोहित्र बसविलेले आहेत. मात्र भुरट्या चोरट्यांनी अनेक विद्युत रोहित्रांचे संरक्षित झाकण चोरी केल्याने रोहित्र उघडे पडले आहे. उघड्या रोहित्रामुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये विद्युत रोहित्रांना पाणवेलींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:59 AM