शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

अडीच वर्षांत हरविलेल्या ४१५ बालिकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:46 PM

फूस लावून पळवून नेणे, मैत्री अथवा प्रेमाचे आमिष दाखवून मागील दोन ते अडीच वर्षांत पळवून नेलेल्या ४६३ अल्पवयीन मुलींपैकी ४१५ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४८ मुलींचा अद्याप थांगपत्ता लागला नसून पोलिसांकडू शोध सुरू आहे.

नाशिक : फूस लावून पळवून नेणे, मैत्री अथवा प्रेमाचे आमिष दाखवून मागील दोन ते अडीच वर्षांत पळवून नेलेल्या ४६३ अल्पवयीन मुलींपैकी ४१५ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४८ मुलींचा अद्याप थांगपत्ता लागला नसून पोलिसांकडू शोध सुरू आहे.खेळण्याच्या व शिक्षणाच्या वयात मुले-मुली आकर्षणातून पळून जाण्याच्या घटना शहरात घडू लागल्या आहेत. यामध्ये फूस लावून अल्पवयीन बालिकांना पळवून नेल्याचे प्रकार समोर आले आहेत. चालू वर्षात आॅगस्टपर्यंत ११८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून, यापैकी ९३ घटनांमध्ये मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुली १५ ते १७ या वयोगटांतील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांकडून तपासाला गती दिली जाते. बहुतांश मुलींना विविध कारणास्तव अथवा फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या मुलींचा पोलिसांनी तपास करत तब्बल४१५ प्रकरणांचा उलगडा करण्यास यश मिळविले. मुलींना पळवून नेणाऱ्या संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.बहुतांश घटनांमध्ये कौटुंबिक नात्यातील व्यक्तींनीदेखील लहान मुलांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे अपहरण केलेल्या बालिकेची पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुटका केली होती. या गुन्ह्यात त्या बालिकेच्या नातेवाइकाविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत अटक केली आहे....अशी आहेत अपहरणाची कारणेपालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष.मुलांना जाणवणारी एकाकीपणाची भावना.टीव्ही मालिकांचा विपरीत परिणाम.सभोवतालच्या वातावरणाचे आकर्षण.प्रेम, मैत्रीविषयीच्या भावना.पौगंडावस्थेत शरीरामध्ये होत जाणारे शारीरिक-मानसिक बदल.मुलींना विविध कारणास्तव अथवा फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या मुलींचा पोलिसांनी तपास करत तब्बल ४१५ प्रकरणांचा उलगडा करण्यास यश मिळविले. मुलींना पळवून नेणाºया संशयितांविरुद्ध कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.अशी आहे मुलींच्या अपहरणाची आकडेवारीवर्ष : अपहरण उकल२०१७ : १६३ १५७२०१८ : १८२ १६५२०१९ (आॅगस्टपर्यंत) : ११८ ९३

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी