ताहाराबाद : स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिंनी विशिष्ट ध्येय समोर ठेवूनच आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.करंजाड येथील जनता विद्यालय, ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमप्रसंगी आमदार तांबे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रचंड स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थीवर्गाने आपल्या अंगी जिद्द आणि चिकाटी जोपासने गरजेचे बनले आहे.धुळे लोकसभा युवक कॉँग्रेस अध्यक्ष सचिन कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले. मोना एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे, करंजाडच्या सरपंच उज्ज्वला देवरे, माजी सरपंच उद्धव देवरे, सुनील खैरनार, ताहाराबादचे माजी उपसरपंच यशवंत पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ.नितीन पवार, राजेंद्र साळवे, नीलेश कांकरिया, युवक कॉँग्रेसचे सोशल मीडियाचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख मिलिंद चित्ते, बागलाण तालुका उपाध्यक्ष भूषण सोनवणे, योगेश कोठावदे, विक्की घांगुर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By admin | Published: September 09, 2016 10:50 PM