याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक-पुणे महामार्गाने सफरचंदाच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला गोंदे फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान मंगेश कटारनवरे, जयेश बोरसे, लाला वाल्मीकी, नवनाथ जोंधळे आदी वाहनांसह घटनास्थळी हजर झाले. तोपर्यंत कंटेनरच्या चालक केबिनमध्ये आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर काही जवानांनी कंटेनरच्या पाठीमागील बाजूने कंटेनरमधील सफरचंदाच्या पेट्या उतरवून घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत एमआयडीसीचे अग्निशमन दलही दाखल झाले होते. दोन्ही वाहनांनी मिळून सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनरच्या केबिनला लागलेली आग आटोक्यात आली. तसेच कंटेनरमधील सफरचंदाच्या पेट्या उतवून घेतल्याने जवळपास साडेपाच लाखांचे नुकसान टाळण्यात यश आले.
फोटो-०६ गोंदे फायर-२
नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे फाट्यावर सफरचंदाच्या कंटेनरला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान.
===Photopath===
060321\06nsk_50_06032021_13.jpg
===Caption===
फोटो-०६ गोंदे फायर-२नाशिक-पुणे महामार्गावर गोंदेफाट्यावर सफरचंदच्या कंटेनरला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्नीशामक दलाचे जवान.