नाशिक- इगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची सेफ्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.
इंडिका गाडीने रात्री नऊच्या सुमारास जुन्या कसारा घाटातुन मुबंईहुन नाशिक जात असताना लतीफवाडी चढाच्या ठिकाणी अचानक घेतला व छोट्या नाल्यात गेली. मात्र पीक इन्फ्रा सेफ्टी टीम पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या लक्षात येताच कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, सुरेश जाधव, सुनील सोनवणे, मुजाहिद शेख यांनी धाव घेऊन गाडीच्या काचा फोडत ड्रायव्हरसह बाजूला बसलेल्या दोघांना बाहेर काढले. तात्काळ महिंद्राच्या अग्निशमन दलाचे गाडी येऊन आग विझविण्यास मदत केली. सदर गाडी गॅस किट असल्याचे बोलले जात आहे.