शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

अग्निशमन नियमांवरून आता भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:05 AM

नाशिक : वैद्यकीय व्यावसायिकांना अग्निशमन उपाययोजना अधिनियम सक्तीचा विषय तप्त असतानाच आता याच कायद्याच्या आधारे सर्व प्रकारच्या इमारती आणि गुदामे तसेच रहिवासी असलेल्या संमिश्र वसाहतींनादेखील फायर आॅडिट सक्तीचे करण्यात आले आहे. येत्या १४ फेब्रुवारीच्या आत यासंदर्भातील कागदपत्रे सादर न केल्यास सर्वच इमारती सील करण्याचा इशारा महापालिकेने लेखी नोटिसीद्वारे दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या फायर सेफ्टीवरूनच आता शहरात भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआॅडिटसाठी महिनाभराची मुदत : अन्यथा इमारती सील करणार गुदामे तसेच रहिवासी असलेल्या संमिश्र वसाहतींनादेखील फायर आॅडिट सक्तीचे १४ फेब्रुवारीच्या आत यासंदर्भातील कागदपत्रे सादर न केल्यास सर्वच इमारती सील करण्याचा इशारा

नाशिक : वैद्यकीय व्यावसायिकांना अग्निशमन उपाययोजना अधिनियम सक्तीचा विषय तप्त असतानाच आता याच कायद्याच्या आधारे सर्व प्रकारच्या इमारती आणि गुदामे तसेच रहिवासी असलेल्या संमिश्र वसाहतींनादेखील फायर आॅडिट सक्तीचे करण्यात आले आहे. येत्या १४ फेब्रुवारीच्या आत यासंदर्भातील कागदपत्रे सादर न केल्यास सर्वच इमारती सील करण्याचा इशारा महापालिकेने लेखी नोटिसीद्वारे दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या फायर सेफ्टीवरूनच आता शहरात भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासंदर्भात नाशिक महापालिकेने एक जाहीर प्रकटन दिले असून, त्यामध्ये म्हटल्यानुसार संपूर्ण राज्यात ६ डिसेंबर २००८ पासूनच महाराष्टÑ आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार भोगवटदारांनी वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यात मुख्य अग्निशमन अधिकाºयांकडे फायर आॅडिट रिपोर्ट सादर करण बंधनकारक आहे. ज्या इमारतींना हा अधिनियम लागू आहे, त्यात सर्व शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट, रुग्णालये, शैक्षणिक इमारती, व्यावसायिक इमारती, नाट्यगृहे, सिनेमागृह, मंगल कार्यालये अशा सार्वजनिक वापराच्या इमारती, औद्योगिक इमारती, गोदामे, पंधरा मीटरपेक्षा उंच रहिवासी वापराच्या इमारती आणि सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती यांचा यात समावेश आहे. महापालिकेने २००९ पासून वेळोवेळी जाहीर सूचना देऊनही फायर आॅडिट रिपोर्ट सादर केले नसल्याने आता सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.त्यानुसार मिळकतधारकांनी त्यांच्या वापरातील इमारतीमध्ये आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना बसविणे आणि बसविली असल्यास ती दुरुस्त करून सदैव कार्यक्षम ठेवावी यासंदर्भात लायसेन्स एजन्सीचा दाखला मुख्य अग्निशामक अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा यासाठी १५ फेबु्रवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. या इमारतींना आहे सक्ती...शासकीय इमारती, हॉटेल्स, रेस्टॉरंट असतील अशा इमारती, रुग्णालये, शैक्षणिक इमारती (बहुमजली शाळा, कॉलेजेस), शॉपिंग कॉम्लेक्स, मॉल्स, आॅफिसेस असलेल्या इमारती, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मंगल कार्यालय असलेल्या सार्वजनिक वापराच्या इमारती, औद्योगिक इमारती, गोदामे, १५मीटरपेक्षा उंच रहिवासी वापराच्या इमारती व सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती.