नाशिक : वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींमध्ये, औद्योगिक परिसरात आग लागून जीवितहानी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच पार पडली.गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत बोलताना वरिष्ठ अधिकारी उमेश फुलदेवरे यांनी इंधन, तपमान, प्राणवायू यांचा असमतोल आग लागण्याच्या दुर्घटनेला जबाबदार असतो. यात अगणित साहित्य नुकसान, जीवितहानी होऊ शकते. परंतु अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आग वर्तन तपशीलवार समजून घेतले तर आगीवर नियंत्रण ठेवणे अतिशय सोपे जाते, असे सांगितले. अग्निशामक योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.यावेळी संजय जाधव यांनी अग्निशामक यंत्र कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमास गुरूगोविंदसिंग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स. परमिंदर सिंग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, उपप्राचार्य डॉ. श्यामकुमार काळपांडे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
‘गुरूगोविंदसिंग’मध्ये अग्निप्रतिबंधात्मक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:49 AM