याप्रकरणी तलाठी डी. आर. मोरे यांनी पंचनामा केला असून तहसिल कार्यालयात अकस्मात जळीताची नोंद घेण्यात आली आहे. ठाकरे यांच्या झोपडीला अचानक आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी ११ हजार रुपये किंमतीचे साहित्य, ७ हजार रुपयांचे धान्य, ८ हजारांची रोकड, १० हजारांचे शेती औजारे व कागदपत्रे जळून खाक झाले आहे. तलाठी मोरे व ग्रामसेवक स्वप्नील बच्छाव यांनी पंचनामा केला आहे. तसा अहवाल तहसिल कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान शासकीय अधिका-यांमध्ये माणुसकी जीवंत असल्याचे डोंगराळे येथील घटनेत दिसून आले. झोपडीला आग लागून मोठे नुकसान झालेल्या ठाकरे यांना तलाठी मोरे व ग्रामसेवक बच्छाव यांनी स्वत: दोन हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत केली आहे.
डोंगराळेला झोपडीला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 5:41 PM