तहसीलदार प्रमोद हिले यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली असून शासन त्यांना योग्य ते सहकार्य करेल, असे आश्वासन हिले यांनी दिले. सायगाव ग्रामपंचायतीने त्या कुटुंबास सर्व संसारोपयोगी वस्तू, किराणा देऊ केला तर ग्रामस्थ रघुनाथ खैरनार, मॉर्निंग ग्रुप यांनी धान्य दिले. येवला येथील गोरख पवार यांनी पीडित कुटुंबास पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले. या प्रसंगी सरपंच गणपत खैरनार, कृषी अधिकारी अशोक कुळधर, रघुनाथ खैरनार, ग्रामपंचायत सदस्य दीपक खैरनार, संदीप पुंड, ग्रामसेवक प्रवीण बोडके, शरद लोहकरे, तलाठी विशाल पाटील, अशोक देवरे, भास्कर आव्हाड, दिलीप निकाळे, बाबुराव गाडेकर, रामनाथ गाडेकर, ज्ञानेश्वर उशीर, श्रावण गाडेकर आदी उपस्थित होते.
आगीत घर भस्मसात; कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:18 AM