वावी : सिन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता काटे व वावीचे उपसरपंच विजय भीमराव काटे यांच्या संपर्क कार्यालयास बुधवारी पहाटे आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.वावी बसस्थानकासमोर माजी आमदार माणिकराव कोकाटे व्यापारी संकुलात काटे यांचे संपर्क कार्यालय आहे. बुधवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खिडकीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वावी पोलिसांना माहिती देऊन व्यापारी संकुलात आग लागल्याची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सदर ठिकाणी काटे यांचे संपर्क कार्यालय असल्याचे निदर्शनास आले.पहाटे तीन वाजेच्या सुमारास काटे यांनी भ्रमणध्वनीहून घटनेची माहिती देण्यात आली. काटे यांच्यासह मित्र परिवार व परिसरातील नागरिकांनी बसस्थानकात असलेल्या जलकुंभातून पाणी आणून आग विझवली. मात्र तोपर्यंत कार्यालयातील सर्व फर्नीचर व रोख ३० हजार रुपये जळून खाक झाले होते. कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. फर्नीचरसाठी मोठ्या प्रमाणात काचांचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे घटनास्थळी काचेचा ढीग साचला होता. सदर आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आगेचा प्रकार लवकर निदर्शनास आल्याने संकुलातील इतर व्यापारी गाळ्यांची हानी झाली नाही.सकाळी परिसरातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुख्तार सय्यद व पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिन्नर येथे संपर्क कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:39 AM
वावी : सिन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता काटे व वावीचे उपसरपंच विजय भीमराव काटे यांच्या संपर्क कार्यालयास बुधवारी पहाटे आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
ठळक मुद्देपहाटे आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक