नाशिकरोड : अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त नाशिकरोड अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात आग व धुरामधून रुग्ण व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक करत मॉकड्रिल केले.अग्निशमन सेवा सप्ताह १४ ते २० एप्रिलदरम्यान साजरा केला जात असून, त्या निमित्ताने नाशिकरोड अग्निशामक केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड मळ्यात बुधवारी एका खासगी रुग्णालयात मॉकड्रिल करण्यात आले. रुग्णालयात आग लागून धूर निर्माण झाल्याने रुग्णालयातून रुग्ण व कर्मचाºयांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक अग्निशामक दलाच्या जवानांनी करून दाखविले. मॉकड्रिलकरिता अग्निशमन दलाच्या गाड्या सायरन वाजवत दाखल झाल्याने प्रारंभी रहिवासी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि;श्वास सोडला. मॉकड्रिलमध्ये मोहन मधे, शांताराम गायकवाड, मनोज साळवे, राजेंद्र आहेर, एस.के. आडके, डी.के. कापसे, आर.आर. काळे, एस.एस. नागपुरे, एफ.बी. भालेराव, के. बी. तोरमड आदी सहभागी झाले होते.
अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त नाशिकरोड अग्निशमन दलाचे मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:17 AM