पंचवटी : गणेशवाडी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला मंगळवारी (दि. १७) दुपारी एक वाजता आग लागल्याची घटना घडली. पंचवटी अग्निशमन व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोर विद्युत रोहित्र असून, दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने रोहित्राजवळ साचलेल्या पालापाचोळ्यावर ठिणगी पडली. झाडाचा पालापाचोळा वाळलेला असल्याने धूर निघायला लागला व नंतर त्याने पेट घेतला. आगीची धग रोहित्रापर्यंत पोहोचली. घटनास्थळी तत्काळ पंचवटी अग्निशमन दलाचे जवान व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटलेल्या रोहित्रावर शिसफायरमधील फोमच्या सहाय्याने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. विद्युत रोहित्राने पेट घेतल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता होती मात्र पंचवटी अग्निशमन दल व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवल्याने अनर्थ टाळला.
गणेशवाडी रस्त्यावरच्या विद्युत रोहित्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:30 PM
पंचवटी : गणेशवाडी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला मंगळवारी (दि. १७) दुपारी एक वाजता आग लागल्याची घटना घडली. पंचवटी अग्निशमन व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोर विद्युत रोहित्र असून, दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने रोहित्राजवळ साचलेल्या ...
ठळक मुद्देअनर्थ टळला : अग्निशमन दलाने तत्काळ हाताळली परिस्थिती