टाक्यांचा स्फोट : घरांना बसलेल्या धक्क्यांनी नागरिक भयभीतघोटी : गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एआरएसएस केमिकल कंपनीत तयार झालेल्या इथेनॉलच्या दोन टाक्यांचा बुधवारी (दि. ६) स्फोट होऊन आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.लष्करी हद्दीलगत असलेल्या एआरएसएस बायोफ्यूल या केमिकल कंपनीतील इथेनॉलच्या एक लाख लीटर क्षमतेच्या इंधन टाकीचा बुधवारी स्फोट झाला. त्यामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरात हादरे बसले,काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्या. अनेकांना तर भूकंपाचीच अनुभूती आली. नागरीक भयभीत होवून घरबाहेर पाळाले होते. इतका मोठा स्फोट होता. त्यानंतर लगोलग दुसºया टाकिचाहि स्फोट झाला.त्यामुळे कंपनीतुन मोठमोठ्या आगिचे लोळ बाहेर पडू लागले. त्यानंतर नागरिकांना आग लागल्याची कल्पना आली .वाडीवºहे पोलिसांनी तत्काळ धाव घेत व्हिटीसी फाटा ते बेलगाव रस्ता वाहतुकीस बंद करून अग्निशामक दलाला पाचरण केले. मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी, नाशिक महानगर पालिका,व घोटी टोलनाका येथील अग्निशामक दलातील वाहनांनी धाव घेत तब्बल तीन ते चार तासांच्या मेहनतीनंतरही आग आटोक्यात आणण्यायाचे प्रयत्न सुरु होते मात्र आग आटोक्यात येत नव्हती. या आगित सुमारे दोन लाख लीटर इथेनॉल हे महागडे केमिकल नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या आगित सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही,तर आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. दरवर्षी या औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत आग लागण्याची घटना घडत असल्याने तसेच या औद्योगिक वसाहतीत अशा केमिकलच्या आणखी कंपन्या असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा उपस्थितांत होती.