पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील पुष्ट्यांचे खोके बनविणाऱ्या कारखान्यास आग लागून पूर्ण कंपनी जळुन खाक झाली. आगीत १ कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथील औद्योगिक वसाहतीत पवन पॅकेजींग ही पुट्टा खोके बनविण्याची कंपनी येत्या पाच वर्षांपासून सुरू होती दि ४ रोजी पहाटे ३ वाजता सदर कंपनीला आग लागली. शनिवार कंपनीला सुटी असल्याने कंपनीत एकही कामगार नव्हता. आग लागल्यानंतर बऱ्याच वेळाने आजूबाजूच्या रहिवाशींनी मालक किरण किशोर डुंगरवाल यांना माहिती दिली. व अग्निशामकला कळविले तो पर्यंत कंपनीच्या अतील भागाने पूर्ण पेट घेतला होता. कंपनीत सर्व द्राक्ष, डाळींब, टोमॅटोसाठी लागणारे पुटट्याचे खोके व इतर मटेरियल असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होते. नाशिक अग्निशामक दलाचे दोन बंब ओझरचा एक बंब पिंपळगाव ग्रामपालिकेच्या बंबाने १४ फेऱ्या मारुन सकाळी ९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. हा कारखाना पूर्णपणे जळुन खाक झाला असून, आगीचे कारण अद्यापर्यंत समजु शकले नाही. ह्या आगीत एक कोटीच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज वत्
पिंपळगावी पुष्ट्याच्या कारखान्याला आग, एक कोटीचे नुकसान
By admin | Published: December 08, 2014 2:05 AM