सिडको : येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.कामटवाडे येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या बाजूस असलेले हमिद खान यांचे भंगार दुकान व छोटू राजेसिंग यांचे विराज चायनीज कॉर्नर या टपरी दुकानास सकाळी साडे नऊच्या दरम्यान अचानक आग लागली. सकाळच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या या दुकानास आग लागल्याचे समजताच सिडको व सातपूर महानगरपालिकेच्या बंबांसह स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांना सुमारे पाऊण तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. उपअधिकारी भोळे, लीडिंग फायरमन परदेशी, आर. ए. लाड, फायरमन लहानगे, गाडेकर, पवार, पटेल, घुगे, सोनवणे आदींनी आग आटोक्यात आणली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भंगार दुकानाला आग; माल खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:05 AM