पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवर असलेल्या शरदचंद्र पवार बाजार समितीत पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या पत्र्यांच्या गाळ्यात ठेवलेले गवत, कागदी खोके जळून खाक झाले. या आगीच्या घटनेत अंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बाजार समिती आवारात व्यापारी वर्गासाठीपत्र्याचे गाळे उभारले आहे. बुधवारच्या दिवशी संध्याकाळी बाजार समिती आवारात असलेल्या गाळ्याजवळ जागेचे लेव्हलिंग काम सुरू होते. यासाठी बाजूला असलेले गाजर गवत पेटवूनदिल्याने आग गाळ्यांपर्यंत पोहोचली. सदर पत्र्यांच्या गाळ्यात गवत आणि खोके असल्याने क्षणार्धात आग पसरली.या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
बाजार समितीतील पत्र्यांच्या गाळ्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:09 PM