शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वरला फटाका स्टॉल गावाबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2021 7:00 PM

त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय ...

ठळक मुद्देसंमती नसल्याने मात्र नगर परिषदेचा बुडाला महसूल

त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन यांनी फटाके विक्रीचा चेंडू पालिकेच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे तुमच्या जबाबदारीवर गावाबाहेरील नेहमीच्या जागेवर स्टॉल उभारा; पण आम्ही लेखी परवानगी देणार नसल्याचे नगर परिषदेने सांगितल्याने अखेर त्र्यंबकेश्वर येथील फटाके विक्रेत्यांनी गावाबाहेर आपले स्टॉल उभारले आहेत.दिवाळीची बाल-गोपालांमध्ये खरी ओळख म्हणजे फटाके, दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतषबाजी!दिवाळीत फटाके फोडल्याशिवाय दिवाळसण साजरा केल्यासारखे वाटत नाही. तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याने या सणाचा सर्वत्र उत्साह चांगलाच जाणवत आहे.त्र्यंबकेश्वर नगर परिषद, तर गेल्या वर्षभरापासुन वसुंधरा अभियान राबवत आहे. त्यामुळे पर्यावरण राखा, प्रदूषण नको. एवढेच नव्हे तर यावर्षी फटाके विक्री बंदीबाबत शासनाचा आदेश असल्याने नगर परिषदांनी फटाके विक्रीस बंदी केली आहे. शहराबाहेर पोलीस स्टेशननजीक फटाके विक्रेत्यांनी स्वखर्चाने १२ गाळे उभारून दुकाने थाटली आहेत.यासंदर्भात नगर परिषदेने आम्ही फटाके विक्रीस बंदी केली आहे. त्यामुळे फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही माझी वसुंधरा अभियान राबवत असून, पर्यावरणाचा समतोल बिघडविणाऱ्या आणि प्रदूषणाला निमंत्रण देणाऱ्या फटाक्यांना आम्ही परवानगी देऊच शकत नाही, असे कार्यालयीन अधीक्षकांनी सांगितले.दुसरीकडे तहसीलदार दीपक गिरासे म्हणतात. ही बाब नगर परिषदेच्या कार्यकक्षेतील असून, त्यांनीच परवानगी द्यायची की नाही ते ठरवावे, तर पोलीस प्रशासनानेदेखील नगर परिषदेकडे अंगुली निर्देश करून आपले अंग झटकले आहे. या परिस्थितीमुळे फटाके विक्रेत्यांनी गाळेही उभारले,महसूल बुडालापालिकेने परवानगीस नकार देऊन नाहक महसूल बुडवला. याउलट अटी, शर्ती घालून परवानगी देणे गरजेचे होते. महसूल विभाग, पोलीस प्रशासन यामध्ये पडण्यास तयार नाही आणि नगर परिषदेने तुमच्या जबाबदारीवर गाळे उभारा, अशी मूक संमतीच दिली आहे. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021trimbakeshwarत्र्यंबकेश्वर