नाशिक : मुंबईकडून उत्तर महाराष्ट्रकडे निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरुपात जाणवला. शहरात विविध ठिकाणी १९० वृक्ष कोसळल्याने अग्निशमन दलावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी मुख्यालयासह सर्व उपकेंद्रांवरील जवानांच्या पुढील दोन दिवसांसाठी रजा रद्द केल्या आहेत.‘निसर्ग’ वादळाचा परिणाम शहरावरही तितकाच होण्याची शक्यता लक्षात घेता बुधवारी सकाळपासूनच महापालिका प्रशासनाने अग्निशमन दलाच्या सर्व जवानांच्या रजा रद्द केल्या. पुढील दोन दिवस कोणीही रजा घेणार नसून आपत्कालीन स्थिती संभवणार असल्याचे गृहित धरून सगळ्यांनी ‘अॅलर्ट’ रहावे असे आदेश देण्यात आले.बुधवारी दिवसभर पावसाची संततधार शहरात सुरू राहिली; मात्र दुपारी चार वाजेपासून हळहळु शहराचे वातावरण अधिकच बदलण्यास सुरूवात झाली. साडेचार वाजेपर्यंत जोरदार पावसाने शहराला झोडपले आणि अग्निशमन दल अधिकच सतर्क झाले. पावसाची ही सलामी जणू त्यांच्यासाठी एकप्रकारची धोक्याची घंटा ठरली. तासभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा साडेसहा वाजेपासून शहरात वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत पावसाने शहर व परिसरात ‘वादळ’ आणले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसाचे पाणी तळमजल्यांसह उंचसखल भागात साचले आणि अग्निशमन दलाच्या अपात्कालीन मदत कार्य सुरू झाल्याचा ‘भोंगा’ वाजला. शहरात काल संध्याकाळपासून सुरू झालेले मदतकार्य गुरूवारी (दि.४) दिवसभर सुरूच होतेमुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर अग्नशमन दलाचे मुख्यालयात २५फायरमन, ८बंबचालक सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांनी सज्ज होते. तसेच उपकेंद्रांनवरील जवानही सर्व सामुग्रीसह रस्त्यांवर उतरले होते. जसे कॉल मिळाले तसे तेथे दाखल होऊन कोसळलेल्या वृक्षांचा अडथळा दूर करण्यावर भर देत होते.
अग्निशमनचा ‘भोंगा’ वाजला : मुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 3:09 PM
साडेचार वाजेपर्यंत जोरदार पावसाने शहराला झोडपले आणि अग्निशमन दल अधिकच सतर्क झाले. पावसाची ही सलामी जणू त्यांच्यासाठी एकप्रकारची धोक्याची घंटा ठरली.
ठळक मुद्देमुख्यालयासह उपकेंद्रांचे जवान रस्त्यांवर जोरदार पावसाने शहराला झोडपले