शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

फटाके विक्रेत्यांना लवादाचा दणका

By admin | Published: October 18, 2016 2:25 AM

कचऱ्याची विल्हेवाट : स्वच्छ पर्यावरण शुल्क करणार वसूल

नाशिक : दिवाळीत शहरभर फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, त्यापासून रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट याबाबत महापालिका उपाययोजना करत आली आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने आता फटाक्यांपासून होणाऱ्या कचऱ्याकरिता फटाके विक्रेत्यांनाच जबाबदार धरत त्यांच्याकडून स्वच्छ पर्यावरण शुल्क म्हणून तीन हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी शहरात २५८ गाळे उभारणीस महापालिकेला परवानगी दिली आहे.दिवाळीत शहरात कोट्यवधी रुपयांचा धूर निघतो. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणावर कचराही रस्त्यांवर साचतो. दिवाळीच्या काळात घंटागाड्यांमार्फत सदर कचरा उचलताना कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येते. शिवाय, ध्वनी व वायू प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निकाल देत फटाक्यांपासून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता फटाका विक्रेते, एजन्सी व दुकानदार यांच्याकडून स्वच्छ पर्यावरण शुल्क म्हणून प्रत्येकी ३००० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने सर्व विक्रेत्यांना नोटीस काढत सदर शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. डोंगरे वसतिगृह मैदानासह खासगी जागांवरही व्यवसाय करणाऱ्या फटाका विक्रेत्यांना सदर शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, महापालिकेने शहरात २५८ गाळ्यांसाठी लिलाव काढले आहेत. त्यात गोल्फ क्लब- ४०, राणेनगर सिडको- १०, संदीप हॉटेल समोर १०, तपोवन साधुग्राम- २०, गौरी पटांगण- १५, चेहेडी रस्ता- २०, नाशिकरोडवरील के. एन. केला हायस्कूलजवळ ४०, गाडेकर मळ्यासमोर २०, शिवाजीनगर मैदान- ८, उपनगर येथील शाळा क्रमांक १२५ जवळील जागेवर ३०, सातपूर क्लब हाऊस- १०, सिडको लेखानगर- १०, राजे संभाजी स्टेडिअम- १५ याप्रमाणे गाळ्यांचा समावेश आहे. सदर गाळेधारकांना स्वच्छ पर्यावरण शुल्कासह सेवाकर, अग्निशमन ना हरकत शुल्क आदि रक्कमही मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)