सटाणा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवासी भागात फटाके विक्री करण्यास मज्जाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना महसूल व पोलीस प्रशासनाने थेट आरम नदीपात्रात जागा दिली आहे. यामुळे यंदा फटाके विक्रेते संकटात सापडले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सटाणा शहर व परिसरात फटाके विक्र ी येथील पोलीस कवायत मैदानावर करण्यात येत होती; मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी पोलिसांनी जागा देण्यास नकार दिल्याने पालिका प्रशासनाने बसस्थानकामागे व्यवस्था केली होती. नुकत्याच उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तहसीलदार सुनील सौंदाणे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत आरम नदीपात्र ही जागा योग्य असल्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे फटाके व्यवसायिकांना अखेर स्थलांतरित व्हावे लागले आहे. बैठकीस फटाके विक्रेते संदेश नेरकर, एकनाथ कोठावदे, फाजल बोहरी, सुनील येवला, डी. व्ही. कापुरे, राहुल शिरोडे, प्रमोद केल्हे, युसूफ बोहरी आदी उपस्थित होते.येवला येथे यंदा फटाक्यांच्या दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर फटाके आणले आहेत. तरी फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी नेमकी जागा कोणती, दुकाने कोठे लावावी हे निश्चित करण्यासाठी पालिकेने चार दिवसांचा कालावधी घेतला. पालिका पुन्हा शनि पटांगणावर फटाक्यांची दुकाने लावू देण्यास राजी झाली असल्याने मंगळवारीच फटाक्यांची दुकाने सजतील, असे चित्र आहे.
फटाके विक्र ी आरम नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:56 PM