शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सेवानिवृत्त सुभेदाराकडून हवेत गोळीबार

By admin | Published: June 02, 2017 1:11 AM

देवळाली कॅम्प : पंचरत्न रेणुकामाता सोसायटी येथे सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : रेस्ट कॅम्परोडवर असलेल्या पंचरत्न रेणुकामाता सोसायटी येथे सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ याने पत्नी व मुलाजवळ आपल्या प्रेमसंबंधाचे असलेले पुरावे मागितले असता त्यांनी नकार दिल्याचा राग येऊन त्याने गॅलरीमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुकामाता सोसायटी पंचरत्नमध्ये ऋषिकेश विलास बारगळ हा आपल्या आईसह राहतो. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ऋषिकेश व त्याची आई घरी असताना वडील सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ घरी आले. त्यांनी पत्नी व मुलाकडे आपल्या प्रेमसंबंधाचे रेकॉर्ड केलेले पुरावे, मोबाइल फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड देण्याची मागणी केली. पत्नी व मुलाने पुरावे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माजी सुभेदार विलास याने आपल्या जवळील परवानाधारक बंदूक पत्नी व मुलाला दाखवून गोळी झाडून मारून टाकेल, अशी धमकी देत गॅलरीत जाऊन आकाशाच्या दिशेने हवेत एक गोळी झाडली. यामुळे परिसरात भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ऋषिकेश बारगळ याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून असून पुढील तपास उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे हे करीत आहे.