मालेगाव : शहरातील म्हाळदे शिवारात गट नंबर १५३, १५७ मध्ये मालमत्तेचा ताबा घेण्यावरून माजी महापौर अब्दुल मलिक मोहमद युनूस आणि माजी आमदार शेख रशीद यांचे बंधू खलील शेख यांच्या दोन्ही गटात वाद झाला असून तलवारी, चॉपर यांचा वापर करीत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पवारवाडी पोलिसात अब्दुल मलिक मोहमद युनूस रा.इस्लामाबाद रविवार वॉर्ड यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी आरोपी खलील दादा,एहसान शेख रमजान दोन्ही रा.मालेगाव,दीपक पवार, रा.मालेगाव हेमंत जगताप,राजेश जोशी दोन्ही रा.नाशिक यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.म्हाळदे शिवारात दुपारी सव्वा ते दोन वाजे दरम्यान ही घटना घडली,।फिर्यादी व आरोपी यांच्यात मालमत्तेचा कब्जा मालकी हक्कावरून वाद होता. फिर्यादी अब्दुल मलिक यांनी घेतलेल्या जमीनीच्या कारणावरून फिर्यादीच्या कबजातील शेतात आरोपींनी अनाधिकाराने प्रवेश केला. त्यानी तेथे असलेल्या पत्र्याचे शेड जेसीबीच्या साह्याने तोडून नुकसान केले. फिर्यादीने आरोपींना पत्र्याचे शेड का तोडले असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून विना परवाना हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर व हातात लहान बंदुका बंदुका घेऊन बंदुकामधून फिर्यादिस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक भोये करीत आहेत.
म्हाळदे शिवारात मालमत्तेचा ताबा घेण्याच्या वादातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 11:50 PM
मालेगाव : शहरातील म्हाळदे शिवारात गट नंबर १५३, १५७ मध्ये मालमत्तेचा ताबा घेण्यावरून माजी महापौर अब्दुल मलिक मोहमद युनूस आणि माजी आमदार शेख रशीद यांचे बंधू खलील शेख यांच्या दोन्ही गटात वाद झाला असून तलवारी, चॉपर यांचा वापर करीत गोळीबार करण्यात आला.
ठळक मुद्देम्हाळदे शिवारात दुपारी सव्वा ते दोन वाजे दरम्यान ही घटना घडली