पाथरे : सिन्नर तालुक्यातील सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामामुळे पाथरे परिसरातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सद्या प्रगतिपथावर आहे. या कामामुळे महामार्गच्या जवळपास राहणाऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. रात्री-अपरात्री कामांचा आवाज तर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील जांब नदीवरील पुलाचे खडक फोडण्याचे काम चालू आहे. यासाठी फायरिंग करावी लागत आहे, परंतु यामुळे अशोक चांगदेव गवळी, राजेंद्र चांगदेव गवळी यांच्या नुकत्याच बांधकाम केलेल्या घरावर फायरिंगमुळे दगड पडत आहे. त्यामुळे जवळपास पाच ते सहा पत्र्यांना मोठंमोठे छिद्रे पडले असल्याने पत्रे निकामी झाले आहे. गवळी यांच्या एका गाईलाही दगड लागल्याने तिला दुखापत झाली आहे. या फायरिंगमुळे ग्रामपंचायतीने नुकतेच वारेगावच्या आदिवासी भागात शेडचे बांधकाम केले आहे. त्यावरही दगड पडल्याने पत्रे फुटले आहे. रवी बारहाते यांच्या दूध डेअरीवरही दगड पडल्याने पत्रे फुटले आहे. फायरिंगमुळे ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यातून कदाचित एकदा व्यक्ती किंवा जनावर जखमी होऊ शकतो. त्यासाठी वेळीच संबंधितांनी दखल घ्यावी, असे गवळी यांनी मागणी केली आहे. आधीच कोरोनाचा काळ त्यात ही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. गवळी यांनी ग्रामपंचायत वारेगावला यासंबंधीत पत्र ही दिले आहे. या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन अशोक गवळी यांनी केले आहे.
---------------
सिन्नर- शिर्डी महामार्गाच्या कामावर करण्यात येणाऱ्या फायरिंग मुळे ग्रामस्थांच्या घराचे नुकसान होत आहे. (२८ पाथरे)
===Photopath===
280421\28nsk_2_28042021_13.jpg
===Caption===
२८ पाथरे