शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पंचवटीत युवकावर गोळीबार

By admin | Published: June 23, 2016 11:24 PM

एकाची प्रकृती चिंताजनक : भरदुपारी घडलेल्या घटनेने घबराट; आठवडाभरात शहरातील तिसरी घटना

नाशिक : दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टकलेनगर कॉर्नरवर महाविद्यालयांच्या परिसरात एका युवकावर गावठी कट्ट्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने गोळीबार केल्याची घटना घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, राहुल टाक हा गंभीर जखमी झाला आहे. आठवडाभरात शहरातील गोळीबाराची ही तिसरी घटना असून, पंचवटी भागातील दुसरी घटना आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टकलेनगर कॉर्नर परिसर येथील विविध महाविद्यालयांमुळे तरुणांचा ‘कॉलेज कट्टा’ बनलेला आहे. गुरुवारी (दि.२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित सुशांत वाबळे, राहुल कदम, मनोज पवार, किरण पवार आदिंनी रोहन शिंदे, अमित देसले, इस्माइल शेख, राहुल टाक, सनी पाटील, रिझवान शेख, राहुल मोरे यांना मारहाण केली. यावेळी संशयित वाबळे याने जवळच्या गावठी कट्ट्याने शिंदेच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी शिंदे याने वाबळेला पाठीमागे ढकलल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या राहुल टाक याच्या डोक्याला लागली. त्यामुळे टाक गंभीर जखमी झाला. त्याला मित्रांनी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. संशयित व फिर्यादी रोहन सुरेश शिंदे आपल्या मित्रांसमवेत जुना वाद मिटविण्यासाठी येथे एकत्र आले होते. शिंदे याचा भाऊ विवेकचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.