जळगाव नेऊर : एरंडगाव खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून अंगणवाडी केंद्रात ग्रामस्थांसाठी प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यावेळी सरपंच मंदाकिनी पडोळ, रत्ना पिंगट, मंदा भिसे, जनार्दन आहेर, भास्कर पडोळ, बबन पिंगट, ज्ञानेश्वर भिसे, माजी सरपंच विलास रंधे, शरद रंधे, शाळा समिती अध्यक्ष रावसाहेब आहेर, पोलीसपाटील देवीदास उराडे, छबू रंधे, अनवर शहा, अशपाक सय्यद, अंगणवाडी सेविका कविता पडोळ, रु क्सार पटेल, सुवर्णा चव्हाण, आशा सेविका मंदा गोसावी, अनिता गोविंद, आरोग्य सेविका हिरवे, आरोग्य सेवक सुनील गांगुर्डे, आरोग्य पर्यवेक्षक खैरे यावेळी उपस्थित होते. यापुढे गावातील सर्वसामान्यांना या बाबीचा मोठा फायदा होणार असून, त्वरीत औषधोपचार मिळाल्यानेरु ग्णांचा त्रास, पैसा व वेळ वाचणार आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायतीतर्फे प्रथमोपचार साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:14 AM