घोटी : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन तथा प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात घेण्यात आलेल्या जिल्हानिहाय मराठी निबंध स्पर्धेत ग्रामीण विभागातून प्रा. मनोहर घोडे यांच्या निबंधाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.जिल्ह्यात ही स्पर्धा राबविण्यासाठी संयोजक म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रुंग्टा हायस्कूलने पुढाकार घेतला होता. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, उच्च पदवीधर व अन्य अशा गटात घेण्यात आली होती. या सर्व गटांना मला आवडलेले पुस्तक, मी काय वाचतो असे विषय देण्यात आले होते. यात जिल्हास्तरीय खुल्या गटातील पहिले पारितोषिक प्रा. मनोहर भिकाजी घोडे यांच्या ‘मी काय वाचतो’ या निबंधाला मिळाले. दरम्यान, या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यात राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक प्रा. डॉ. आनंद काटीकर यांच्या हस्ते तीन हजार रु पये रोख, सन्मानपत्र व दोन पुस्तके प्रा. घोडे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, समन्वयक व्यंकटेश सूर्यवंशी, सचिव गजानन हांडे, डी. जी. कुलकर्णी, वसंतराव जोशी व स्पर्धा समिती प्रमुख सुनील हिंगणे आदि उपस्थित होते. दरम्यान, प्रा. घोडे यांच्या येथील सत्कारप्रसंगी आमदार निर्मला गावित, जि. प. सदस्य बेबी माळी, सरपंच कोमल गोणके, ग्रामपालिका सदस्य संतोष दगडे, रामदास शेलार, उपसरपंच मंगल आरोटे, समाधान जाधव, पांडुरंग शिंदे, जे. के. मानवेढे, बाळासाहेब वालझाडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत घोटीचे मनोहर घोडे प्रथम
By admin | Published: December 17, 2015 11:37 PM