नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या एकूण ३ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेलेच बहुतेक विद्यार्थी प्रवेश घेणार असून, द्वितीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अत्यल्प विद्यार्थी प्रवेश घेण्याची शक्यता असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबण्याचे संकेत दिसत आहे.विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २१ आॅगस्टपर्यंत प्रवेशाची संधी असून विशेष फेरीनंतरही २ हजार ९२२ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार एकही कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्याने हे विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. तर संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकीही अनेकांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना विशेष फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी शेवटची फेरी होत असून, या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत पहिल्या चार फे ऱ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, विशेष फेरीत ३ हजार २०३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवार, दि. २१ आॅगस्टपर्यंत संधी देण्यात आली आहे.
एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:48 AM
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
ठळक मुद्देअकरावी प्रवेशाची प्र्रक्रिया लांबणार